संसाधने

आमच्या बातम्या आणि लेख

दिनदर्शिका २०२६ चे अनावरण

कुष्ठरोगाविषयी माहिती व जनजागृतीसाठी दिनदर्शिकेचे प्रकाशन.
प्रकाशित दिनांक १३ डिसेंबर २०२५

दिनांक १३.१२.२०२५ रोजी मा. ना. श्री. प्रकाशजी आबीटकर साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते दिनदर्शिका २०२६ चे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमास मा. डॉ. शशिकांत शंभरकर, उप संचालक आरोग्य विभाग, नागपूर; डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर; डॉ. मोहपे, नागपूर; डॉ. राहुल कन्नमवार, अध्यक्ष, मॅग्मो महाराष्ट्र; डॉ. संदीप गेड़ाम, वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच सहायक संचालक, कुष्ठरोग विभाग, चंद्रपूर; व डॉ. अमित सालवे, उपाध्यक्ष, मॅग्मो उपस्थित होते.

सहायक संचालक, कुष्ठरोग कार्यालय, चंद्रपूर, द लेप्रोसी मिशन ट्रस्ट व लेप्रा सोसायटी यांच्या सौजन्याने सदर दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.

कुष्ठरोगाविषयी उपचारासंबंधी माहिती देणे व जनजागृती करण्याच्या उद्देशाने सदर दिनदर्शिका चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कुष्ठरुग्ण तसेच सर्व आरोग्य संस्थांना वितरित करण्यात येणार आहे.

योगदानामध्ये सहभागी व्हा आणि अभिमान अनुभवा

सदस्य व्हा