संसाधने

आमच्या बातम्या आणि लेख

कुष्ठरोग मुक्त समाजाकडे एक पाऊल

जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जनजागृती व उपचारावरील विशेष आकाशवाणी कार्यक्रम.
प्रसारण : शुक्रवार, 30 जानेवारी 2026, सकाळी 10:00 वाजता

शुक्रवार, 30.01.2026 रोजी जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावर 'कुष्ठरोग मुक्त समाजाकडे एक पाऊल' या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. संदीप गेडाम, कुष्ठरोग विभाग अधिकारी, चंद्रपूर यांची संगीत लोखंडे यांनी मुलाखत घेतली.

मुलाखतीदरम्यान कुष्ठरोगाविषयी जनजागृती, वेळेत निदान, उपलब्ध उपचार पद्धती तसेच सामाजिक गैरसमज दूर करण्यावर भर देण्यात आला.

हा कार्यक्रम 103 MHz FM आकाशवाणी चंद्रपूरवर प्रसारित करण्यात आला तसेच NewsOnAir अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले.

कुष्ठरोग मुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांनी जनजागृती करण्याचे व बाधित व्यक्तींना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

योगदानामध्ये सहभागी व्हा आणि अभिमान अनुभवा

सदस्य व्हा